Pune News : 15 लाखांचे दागिने लंपास करणार्‍या महिलेला अटक, घरकाम करत होती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरकाम करण्यासाठी ठेवलेल्या महिलेनेच घरी कोणी नसल्याचा फायदा घेत 15 लाखांचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान दागिने घेऊन पसार झालेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तर तिच्याकडून चोरुन नेलेले 28 तोळे दागिने जप्त केले आहेत.

बंगारेव्वा चंद्रम हराळे (वय 49, रा. हडपसर, मूळ. चंद्रम, चडचण, कर्नाटक) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विजय राजन फराटे (वय 33, रा. अमरनगरी, हडपसर, मूळ. रा, बारामती) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी हे गाडीतळ भागात राहतात. त्यांनी घरी काम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कामाला ठेवले होते. दरम्यान तीन दिवसांपूर्वी फराटे हे आई-वडिल याना एका रूग्णालयात घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी घर काम करण्यासाठी घराची चावी दिली. यानंतर हराळे हिने घरात कोणी नसल्याची संधी साधत कपाटातले 22 तोळे दागिने रोकड व रोकड असा 14 लाख 93 हजारांचा ऐवज चोरून पसार झाली होती.

फराटे हे परत आल्यानंतर त्यांना चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच कामगार महिलेवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलीस तिचा शोध घेत होते. यावेळी ती कोल्हापूर मार्गे कर्नाटकात गेली आणि ओरत देखील आली असल्याचे समजले. यानंतर तिला हडपसर भागातून पथकाने तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरी केली असल्याची माहिती दिली. तिच्याकडे बॅगेत 14 लाख 93 हजार रुपयांचा ऐवज मिळाला आहे.

परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक माने, कर्मचारी टोम्पे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.