Pune News : पुण्यातील खासगी कोचिंग क्लासेस, लाईट हाऊस, ट्रेनिंग सेंटर उद्यापासून सुरू होणार – मनपा अति. आयुक्त रूबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शहरात गेल्या 18 मार्चपासून बंद असलेले खासगी कोचिंग क्लासेस, लाईट हाऊस आणि ट्रेनिंग सेंटर उद्यापासून (मंगळवार) सुरू होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल (Rubel Agarwal) यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या अनेक महिन्यांपासुन खासगी कोचिंग क्लासेस बंद होते. आज अखेर खासगी कोचिंग क्लासेस ( Private Coaching Classes) सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.

खासगी क्लासेस, लाईट हाऊस आणि ट्रेनिंग सेंटर गेल्या 9 महिन्यांपेक्षा देखील अधिक काळापासून बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती तर काही खासगी क्लासेस बंद पडण्याच्या मार्गावर होते. आज अखेर पुणे महापालिकेकडून उद्यापासून (मंगळवार) खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे.