Pune News : पुणे शहर पोलिस दलातील उपनिरीक्षकाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहर पोलीस दलातील(Pune Police) उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

उपनिरीक्षक चंद्रकांत झेंडे ( Chandrakant Zende) (वय 54) असे मृत्यू झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.

झेंडे पोलीस कर्मचारी म्हणून पुणे शहर पोलीस दलात भरती झाले होते. त्यांची बडती झाल्यानंतर ते नुकतेच उपनिरीक्षक झाले होते. सध्या ते नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते.

दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. अत्यंत शिस्त प्रिय आणि सर्वांशी हसून खेळून राहत असल्याने ते पोलीस दलात ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुल, पत्नी असा परिवार आहे.