Pune News | पुणे : कोथरुड येथील पौड फाटाजवळील दशभुजा गणपती मंदिराजवळ रिक्षावर गुलमोहराचे झाड कोसळून चौघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | कोथरुड येथील पौड फाटाजवळील (Kothrud Paud Phata) दशभुजा गणपती मंदिराजवळ एका रिक्षावर झाड कोसळल्याने त्यात तिघे जण जखमी झाले. सुदैवाने रिक्षातील तिघांना किरकोळ जखमा झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ही घटना सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी घडली. (Pune News)

याबाबत अग्निशामक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील दशभुजा मंदिराजवळील कॅनॉल रोडवरुन रिक्षा
जात होती. त्याचवेळी एक गुलमोहराचे झाड उन्मळून रिक्षावर पडले. त्याचवेळी तेथून एक दुचाकीही जात होती. दुचाकीचालक सुदैवाने वाचला. झाड रिक्षावर पडल्याने त्यातील प्रवासी आत अडकले होते.
अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन झाडाच्या फांद्या बाजूला करुन आतील
प्रवाशांची सुटका केली. त्यांना किरकोळ जखमा झाल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. (Pune News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Caste Wise Census | बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश

07 October Rashifal : सिंह, तुळ आणि मकर राशीवाल्यांची होणार आर्थिक प्रगती, वाचा दैनिक भविष्य

Ghorpadi Mundhwa Railway Over Bridge | घोरपडी येथील रेल्वे उड्डणापुल आणि विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाच्या 110 कोटी रुपयांच्या एस्टीमेटला महानगरपालिका प्रशासनाची मान्यता

ACB Trap Case News | लाच घेताना माध्यमिक आश्रम शाळेचा ग्रंथपाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शिक्षण क्षेत्रात खळबळ