Pune News | बाबा भिडे पुल होणार 2 महिन्यांसाठी बंद; ‘या’ पर्यायी मार्गाचा करावा वापर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यातील बाबा भिडे पूल (Bhide Bridge) हा डेक्कन ते नदीपात्र प्रवास करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. मेट्रोचे (Pune Metro) काम चालू असल्यामुळे या पुलाजवळ वाहनांची मोठी गर्दी झालेली दिसून येते. आता मात्र पुढील दोन महिन्यांसाठी बाब भिडे पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation (PMC) भिडे पूल परिसरामध्ये पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे हा पूल आता दोन महिने पुणेकरांना वापरता येणार नाही. मात्र यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहे. त्यामुळे दोन महिने पुणेकरांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून (Pune Traffic Branch) करण्यात आले आहे. (Pune News)

महानगर पालिकेकडून शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्याचे काम चालू आहेत. तसेच पुणे मेट्रोचे देखील जोरदार काम सुरु असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नागरिकांना वाहतुक कोंडीचा (Pune Traffic Jam) सामना करावा लागत आहे. भिडे पूल परिसरामध्ये देखील मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे अनेकदा सायंकाळी तुफान गर्दी असलेली दिसून येते. मात्र आता पुढील 2 महिन्यांसाठी भिडे पूल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना वळसा घालून जावे लागणार आहे. डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सोमवारपासून (16 ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. गरज असल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. (Pune News)

बाबा भिडे पूल बंद करण्यात येणार असल्यामुळे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून
करण्यात आले आहे. पूल बंद असल्याने केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच केळकर रस्त्यावरुन जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे,
तसेच जंगली महाराज रस्त्यावरुन केळकर रस्तामार्गे नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा म्हणजेच झेड ब्रिजचा वापर करावा. भिडे पूल, सुकांता हॉटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. असे आवाहन वाहतुक विभागाकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | “कोणतीही चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत” आढावा बैठकीमध्ये अजित पवारांचे आदेश

Old Mumbai-Pune Highway | तीन दिवस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी