Pune News : भाजपा ‘सहकार’ आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी सचिन दांगट यांची निवड

पुणे – वारजे येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते तसेच स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट (Sachin Dangat) यांची भाजपा सहकार आघाडी च्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . पुणे शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र सचिन दांगट (Sachin Dangat)  यांना दिले .याप्रसंगी शहराध्यक्ष संघटनमंत्री रवि अनासपुरे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस गणेश घोष , दीपक पोटे , दीपक नागपुरे , प्रवक्ते धनंजय जाधव , विकास लवाटे ,दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले,भाजपा शहर पदाधिकारी यांचेसह सहकार आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . गेली ५ वर्षे सचिन दांगट हे पुणे पालिकेचे स्वीकृत सभासद म्हणुन काम करीत आहेत .

२०१७ साली झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र ३२ मधुन पराभवाला सामोरे गेल्यानंतर सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात ते कायम अग्रेसर आहेत .कोरोनाचे काळात सत्तेत नसताना हजारो लोकांना कोरडा शिधा वाटप , औषधे वाटप , ४००० परप्रांतीय नागरिकांना डॅाक्टर फिटनेस सर्टीफिकेट , पोलीस पासेस व्यवस्था असे अनेक मदतीचे कार्यक्रम तसेच पक्षाचे दिलेले सर्व कार्यक्रम भाजपाचे वतीने घेतले आहेत .

यापुर्वी पुणे महानगरपालिका प्रभाग क्र ३२ चे भाजपाचे उमेदवार , सरचिटणीस खडकवासला विधानसभा मतदार संघ , स्वीकृत सभासद पुणे मनपा यांचेसह अनेक सामाजिक संस्थाचे पदाधिकारी म्हणुन त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे .
समाजोपयोगी आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणुन सचिन दशरथ दांगट यांची ओळख आहे .