Pune News : शिवसेनेचे कार्यालय हे शाखा नसून न्याय मंदिरे आहेत : रविंद्र मिर्लेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मंदिरात लोकं श्रद्धेने काही इच्छा घेऊन येतात, देवाकडे काही मागितले तर ते पुर्ण व्हावी अशी भावना आपल्याला असते म्हणून आपण तिथे डोकं टेकतो. या कार्यालयाच्या माध्यमातून काम करत असताना आपली वागणूक ही “जोजे वांचील तोते लाभो” जो कोणी या शाखेत सहकार्य आधार मागायला येईल त्यांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्ही केली पाहिजे. मुंबईतील जनता एखादी तक्रार पोलीस किंवा न्यायालयात दाखल करण्या ऐवजी शिवसेनेच्या शाखेत देणे सोयीचे समजते करण त्यांना न्याय मिळेल असा विश्वास येथे असतो. असाच विश्वास आपण देखील संपन्न कराल अशा शुभेच्छा शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांनी दिल्या.

शिवसेना, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन शिवसेना उपनेते, समन्वय पश्चिम महाराष्ट्र मा. रविंद्रची मिर्लेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आज रविवार दि. १८ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले. शिवसैनिक अजय माणिकराव शिंदे यांच्या या शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभा प्रसंगी बाळाभाई कदम (संपर्क प्रमुख, पुणे शहर), संजय मोरे (पुणे, शहर प्रमुख), प्रशांत बधे ( जनसंपर्क प्रमुख, पुणे शहर), आनंद मंजाळकर (शिवाजीनगर विधानसभा प्रमुख) आदी पदाधिकारी, शिवसैनिक व प्रभागातील महिला तसेच पुरुष नागरिक उपस्थित होते.

शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, येता काळात पुणे शहरातील नागरिकांना एखाद्या गोष्टीसाठी मनपा कार्यालय किंवा क्षेत्रीय कार्यालयात चक्रा मारायला लागू नये यासाठी शिवसेना जागोजागी जनता दरबार आयोजित करणार. एका छताखाली, एकाच वेळेत सर्व अधिकारी व नागरीक आमनेसामने येवून समस्या सोडवतील. या अनुषंगाने आम्ही सर्व शिवसैनिक काम करू.

शिवसैनिक अजय माणिकराव शिंदे म्हणाले, हे कार्यालय माझे नसून जनतेचेच कार्यालय आहे, २४/७ कोणताही नागरिक येथे आपल्या समस्या मांडू शकेल सोबतच आपले विचार व सुजाव देऊ शकेल. सर्वांना समान न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करील असा विश्वास या शाखा उद्घाटनप्रसंगी देतो.