Pune News : बंद फ्लॅट फोडणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बंद फ्लॅट फोडणाऱ्या सराईताला सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 6 घरफोड्याचे गुन्हे उघडकीस आणत दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

समिर ऊर्फ सोन्या वाल्मीक खेडेकर (वय-२८ वर्ष रा.चाळ नं. अटल ११. अगम मंदिरा जवळ आंबेगाव खु. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्या अन वाहन चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत. काही भागात तर सतत या घटना घडत आहेत. दरम्यान सिंहगड रोड पोलिसांनी मात्र हद्दीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पेट्रोलिंग वाढवत सराईत गुन्हेगाराची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम गुन्हे कमी होण्यास झाला आहे. दुसरीकडे तपास पथक तांत्रिक विश्लेषण करीत माहिती काढत होते. यावेळी पथकाला आरोपी बाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला वडगाव ब्रिज येथील हॉटेल पी के बिर्याणी समोरून गुंड समीर उर्फ सोन्या वाल्मीकी खेडकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सहा ठिकाणी सहा ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सोन्याचांदीचे असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सहकारनगर व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात यापूर्वीचे 9 गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, कर्मचारी मोहन बुरुक, रफिक नदाफ, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.