Pune News | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा पुण्यात संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड, सांगली (Mahatma Basaveshwar Vadhu-Var Suchak kendra) या संस्थेच्या वतीने रविवार ( दि.21) पुणे (Pune News) येथील वेदशास्त्रोत्तेजक सभा या हॉलमध्ये (Vedashastrottejak Sabha Hall) दुपारी 12 ते 4 या वेळेत लिंगायत धर्मातील (Lingayat religion) सर्व पोटजातींसाठी वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. पुण्यात (Pune News) झालेल्या या मेळाव्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. वधु-वर पालक व मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे (Appasaheb Shegave) यांनी केले.

 

महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लिंगायत बांधव नोकरी निमित्ताने पुण्यात (Pune News) असल्याने त्याचा लाभ वधु-वर पालक यांना घेता आला याचे समाधान वधु-वर पालकांनी व्यक्त केले . वधु-वर पालकांनी उच्चशिक्षित, नोकरदार हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. या मेळाव्याचे उद्घाटन ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्रच्या संस्थापक अध्यक्षा निशा बिडवे, ज्येष्ठ पत्रकार नंदिनी पाटील यांच्या हस्ते झाले.

 

 

 

 

यावेळी प्रमुख पाहुणे महात्मा बसवेश्वर नाट्य निर्माता राजेंद्र आलमखाने, द्राक्ष बागायतदार सचिन करगणे,
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश डीगोळे, उत्तम तोडकर, राकेश तामगावे, प्रशांत माळी,
प्रवीण जायगोंड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
आभार प्रियांका शेगावे यांनी केले. यावेळी मागील वर्षातील वधु-वर संग्रह पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते भेट (Pune News) देण्यात आले.

 

 

– ज्यांना कार्यक्रमात भाग घेता आला नाही त्या उमेदवारांनी फोटो व बायोडाटा 9975185511 या नंबरवरती पाठवावा

 

– Online नोंदणी करण्यासाठी 9975185511 या नंबर वरती फोन पे, गुगल पे आहे.
नोंदणी केलेल्या वधु-वर यांना सांगली ,पुणे व सोलापूर मध्ये होणाऱ्या मेळाव्याची एकत्र पुस्तक प्रकाशित करून 15 डिसेंबर पर्यंत देण्यात येणार आहे.

 

– या संस्थेच्या वतीने सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बेळगांव, अथनी, गुडापुर इत्यादी ठिकाणी मेळावा होणार असून याचा फायदा नोंदणी केलेल्या वधु-वर यांना होणार आहे.

 

– सदर मेळाव्या सहभागी होऊ न शकलेल्या वधु-वर पालकांनी ऑनलाईन नोंद करण्याचे आवाहन आप्पासाहेब शेगावे यांनी केले आहे.

 

Web Title :- Pune News | State level highly educated Lingayat Vadhu-War Parent Introduction Meet held in Pune-Mahatma Basaveshwar Vadhu-Var Suchak kendra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा