Pune News : मास्क परिधान न करता फिरणार्‍यांवर कडक कारवाई – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत असल्याने पुणे पोलिसांनी मास्कची कारवाई कडक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. आता मास्क न घालता फिरणाऱ्यांवर जास्तीत जास्त कारवाई करा, असे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना आदेश असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता सांगितले आहे.

शहरात कोरोना रुग्णाचा आकडा दररोज वाढत चालला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पण तरीही काहीजण मास्क न घालताच फिरत आहेत. रस्त्यावर फिरताना अनेकजण मास्क घालत नसल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच सुरक्षित अंतराच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांकडून सध्या मास्क काही चौकात थांबून मास्क न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात आहे. तसेच, प्रवाशी कारमध्ये मास्क न घालता प्रवास करणाऱ्यावर कारवाई करून पाचशे रूपयांचा दंड वसूल केला जात आहे. तरीही ही कारवाई ठराविक वेळ व काही ठिकाणीच होत होती. आता शहरात मोठ्या प्रमाणात मास्कची कारवाई केली जाणार आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णाचा आकडा वाढत असून, सर्व पोलिस ठाण्यांना व पथकांना मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.