Pune News | सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ करणार बलात्कारग्रस्तांना कायदेविषयक मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | बलात्कार प्रकरणातील पिडीत स्त्रिया आणि साक्षीदारांना कायदेविषयक मदत करण्यासाठी सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ (‘Rape Crisis Center’, Sahyog Trust) सुरु करण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणातील पिडीत स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपल्या हातून पाप घडले व आपलीच चूक आहे, अशी स्वतःलाच दोष देणारी भावना, मनातील भीती, राग या संदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्याचे काम सेंटरद्वारे केले (Pune News) जाणार आहे.

प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. बलात्कारातून सावरणाऱ्या स्त्रियांना कायदेविषयक मदत देण्यातून अशा माणुसकीविरोधी गुन्ह्यांना केवळ प्रतिबंधच होणार नाही तर अत्याचारग्रस्त स्त्रियांना सशक्तपणे व विश्वासाने जगण्यासाठी परिणामकारक मदत होऊ शकते, असे सहयोग ट्रस्टच्या सचिव ॲड. रमा सरोदे (Secretary of Sahyog Trust Adv. Rama Sarode) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत सुरेखा दास (Surekha Das), रेश्मा गोखले (Reshma Gokhale), गौरांगी ताजने (Gaurangi Tajne), ॲड. अजित देशपांडे (Adv. Ajit Deshpande), ॲड. अक्षय देसाई (Adv. Akshay Desai), शार्दूल सहारे (Shardul Sahare), तृणाल टोणपे (Trinal Tonpe) हजर होते.

बलात्कारासह जगणारे त्यांचे दुख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून विशिष्ट दिवशी आमच्या कार्यालयात ‘सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे. ज्या महिलांवर लैंगिक आक्रमण झालेले असते त्यांनी जणू काही स्वतःच चूक केली आहे असा दबाव घेऊन त्या जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातील ताणतणाव एकमेकांसोबत संवाद साधण्यातून कमी करण्याचा प्रयत्न ‘सपोर्ट ग्रुप’ करेल.
यातूनच बलात्काराच्या केसेस भीतीचे दडपण न बाळगता लढण्याची हिम्मत या स्त्रियांमध्ये निर्माण होईल
आणि त्या सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील बालात्कार प्रकरणातील पिडीत स्त्रिया आणि त्यांचे नातेवाईक सहयोग ट्रस्ट च्या 020-25459777 या क्रमांकावर संपर्क साधू शकतील.

 

‘मायग्रोथ झोन’ ची मदत :

‘मायग्रोथ झोन’ कंपनी (MyGrowthZone Company) न्युरोलिंगविस्टिक तंत्रावर काम करते.
त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तीद्वारे बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिक दृष्ट्या ताकदवान करण्यासाठी मोफत मदत करण्यात येणार आहे.
‘मायग्रोथ झोन’ सोबत सहयोग ट्रस्ट सहकाऱ्याच्या भावनेतून बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना,
आपल्या हातून पाप घडले व आपलीच चूक आहे अशी स्वतःलाच दोष देणारी भावना, मनातील भीती,
राग या संदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी सुधा काम करणार असल्याची माहिती ॲड. सरोदे यांनी दिली.

 

देशात दररोज 88 बलात्कार :

लॉ इंटर्न गौरांगी ताजने हिने देश व राज्यातील बलात्काराच्या आकडेवारीची माहिती देताना सांगितले की, 2019 मध्ये भारतात 32559 बलात्काराच्या घटना झाल्या.
म्हणजे, दररोज 88 बलात्कार झाल्याची माहिती NCRB च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, तर महाराष्ट्रात 2019 मध्ये 2299 केसेस नोंद झालेल्या आहेत.

Web Title : Pune News | The Rape Crisis Center will provide legal aid to rape victims, ahyog Trust pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update