Pune News | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची फर्स्ट एड पॉलिक्लिनिकला भेट; लहू बालवडकर यांच्या कामाचे केले कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी आज बालेवाडी येथील फर्स्ट एड पॉलिक्लिनिकला (First Aid Polyclinic) भेट दिली. पवार यांनी सोशल वेलफेअरचे संस्थापक लहु बालवडकर (Lahu Balwadkar, founder of Social Welfare) यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली, यावेळी नागरिकांना अल्प दरात आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने चालवण्यात येणाऱ्या या आरोग्य केंद्राच्या कामाचे त्यांनी कौतुक (Pune News) केले.

यावेळी बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या की, नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचे लहु बालवडकर (Lahu Balwadkar) करत असलेले काम स्तुत्य आणि प्रशंसनीय आहे. यामुळे आरोग्य विभागाला देखील नक्कीच मदत होत आहे. तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. भविष्यकाळात देखील असेच आरोग्याविषयक उपक्रम आपल्या सोशल वेलफेअरच्या माध्यमातून राबविले जावेत जेणेकरून कोणीही या आरोग्यसेवेपासून वंचित राहणार (Pune News) नाही.

बालेवाडी (balewadi) येथील फर्स्ट एड पॉलिक्लिनिकच्या (First Aid Polyclinic) या सदिच्छा भेटीच्या वेळी लहु बालवडकर सोशल वेलफेअरचे अध्यक्ष लहु बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, गणेशद कळमकर, प्रभाग क्र. 9 च्या भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा गाडगीळ, उपाध्यक्षा नैना पोळ, आय. टी सेलच्या अध्यक्षा उज्वला साबळे, रिना सोमय्या, राखी श्रीवास्तव, शिवानी अग्रवाल, सिमरन पुला, शिवम सुतार, सचिन दळवी, शिवम बालवडकर व इतर पदाधिकारी उपस्थित (Pune News) होते.

 

Web Title :- Pune News | Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar’s visit to First Aid Polyclinic; Appreciated the work of Lahu Balwadkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 122 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | ‘सिक्स पॅक’साठी बेकायदा औषधांची विक्री ! पुणे पोलिसांकडून चार जणांना अटक; औषधाच्या 211 बाटल्या आणि कार जप्त (व्हिडीओ)

Maharashtra Unlock | राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना, मुख्यमंत्र्यांकडून निर्बंध शिथील