Pune News | मुलाच्या घरी आलेल्या आईचा दुर्दैवी मृत्यू, कपडे वाळत घालताना 8 व्या मजल्यावरुन पडली महिला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मुलाकडे राहायला आलेल्या आईचा इमारतीच्या 8 मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची (woman dies after falling 8th floor) घटना पुण्यात (Pune News) घडली आहे. मृत महिला घराच्या गॅलरीत (Gallery) कपडे वाळू घालत असताना 50 वर्षाच्या महिलेचा तोल गेला. यामध्ये खालीपडून जखमी झालेल्या महिलेचा उपचापुर्वीच मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील (Pune News) आंबेगावातील (ambegaon) एका नामांकित सोसायटीत घडली.

केसरीदेवी हरिजी सिंग (वय-50) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
केसरीदेवी सिंग (Kesari Devi Singh) या पुण्यातील आंबेगाव खुर्द मधील दत्तनगर भागातील बहुमजली लेकवुड या नामांकित सोसायटीत (lakewood society ambegaon) मुलाकडे रहायला आल्या होत्या. सिंग कुटुंबीय हे मुळचे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रहिवासी आहे.

केसरदेवी या पुण्यात त्यांच्या मुलाचे लेकवुड सोसायटीत आठव्या मजल्यावर घर आहे.
त्यांचा मुलगा आणि सून पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे त्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी आल्या  होत्या. मंगळवारी (दि.7) सकाळी सातच्या सुमारास त्या कपडे वाळू घालण्यासाठी गॅलरीत गेल्या होत्या.
मात्र, कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरुन खाली कोसळल्या.
अचानक झालेल्या या घटनेमुळे सोसायटीत एकच खळबळ उडाली.

सोसायटीमधील नागरिकांनी केसरी देवी यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
रुग्णालयाने या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास भारती पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune News | woman dies after falling from 8th floor while drying clothes incident in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rajesh Tope | महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? राजेश टोपे म्हणाले…

Thane Anti Corruption | वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली 5 हजाराची लाच, पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह प्लंबर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Minor Girl Rape Case | ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी केला बलात्कार, आणखी 6 जणांना अटक