Pune News | कात्रज तलावाजवळील ‘स्मार्ट पदपथाचे’ काम वर्षभरापासून रखडले; अर्धवट कामावरून नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशय अर्थात कात्रज तलावाकडे (Nanasaheb Peshwa Pond, Katraj Dam Lake) जाणार्‍या रस्त्याच्या कडेला ‘स्मार्ट पदपथ’ करण्याचे काम अर्धवट राहीले आहे. साधारण वर्षभरापासून रखडलेल्या या कामावरून ‘उलट सुलट’ चर्चा सुरू झाली (Pune News) आहे.

कात्रज – कोंढवा रस्त्यावरील (Katraj Kondhwa Road) राजस सोसायटी (rajas society katraj) चौकातून पेशवे तलावाकडे जाणार्‍या डीपी रस्त्याच्या (DP Road) एका बाजूला ‘स्मार्ट पदपथ’ करण्याचे काम सुरू आहे.
या पदपथावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून मागीलबाजूस असलेल्या ओढ्याच्या कडेला लोखंडी सुरक्षा जाळी उभारण्यात आली आहे.
तर पदपथावर ठकाविक अंतरान नागरिकांना बसण्यासाठी ग्रॅनाईटच्या फरश्यांच्या मदतीने बैठक व्यवस्था करण्यात आली (Pune News) आहे.

 

यासोबतच पदपथाला रस्त्याच्या बाजूने सिमेंट ब्लॉक्स उभारून मध्यभागी सुशोभिकरणासाठी फुलझाडे लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष असे की साधारण वर्षभरापुर्वी हे सर्व काम करण्यात आले आहे.
मागीलवर्षी कोरोनामुळे अनेक प्रकल्पांची कामे बंद असल्याने हे काम देखिल अर्धवट राहीले (Pune News) असावे.
अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. परंतू यंदाच्यावर्षी बर्‍यापैकी कामे सुरू झाली आहेत.
अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीचे सात महिने उलटल्यानंतरही हे काम सुरूच न झाल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
हे काम मागीलवर्षीच्या अंदाजपत्रकीय तरतुदींतून करण्यात आले असेल तर अद्याप अर्धवट का ठेवण्यात आले आहे.
कामासाठी निधी कमी असेल तर प्रशासनाने उर्वरीत कामासाठी निधी का दिला नाही.
या कामाची निविदा काढण्यापुर्वीच काम सुरू करण्यात आले? अशा एक ना अनेक चर्चा कात्रज परिसरात रंगल्या आहेत.
किमान या स्मार्ट पदपथावर वापरण्यात आलेल्या साहित्याची तोडफोड अथवा चोरी होउन आर्थिक नुकसान होउ नये.
असे वाटत असल्यास उर्वरीत काम पुर्ण करुन नागरिकांच्या वापरासाठी पदपथ खुला करावा, अशी मागणी स्थानीक नागरिक करू लागले (Pune News) आहेत.

 

Web Title : Pune News | Work on the smart footpath near Katraj Lake has been stalled for years; Controversy among citizens over partial work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Police | देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील 3 पोलीस स्टेशनचा समावेश

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांचे होणार मोठे नुकसान, निम्माच मिळणार दिवाळी बोनस

Nandurbar Crime | धक्कादायक ! दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या पत्नीला ‘शॉक’ देत जीवे मारण्याचा प्रयत्न