Pune Ola- Uber | ओला-उबेरला तात्पुरता परवाना बंद, आता लागणार पक्का परवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ola- Uber | ओला, उबेरसारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तात्पुरत्या परवान्याचा ‘स्टेटस स्को’ (Status Sco) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हटवला असून, येत्या 20 एप्रिल 2023 पर्यंत पक्का परवाना (License) काढून घ्या, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी प्रवासी वाहतुकीसाठी वैध परवाना आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी प्रवासी वाहतुकीचा (Pune Ola- Uber) वैध परवाना नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रॅपिडोची (Rapido) याचिका फेटाळली होती.

 

रॅपिडोची याचिका फेटाळल्यानंतर, उबेरला प्रोव्हिजनल (तात्पुरता परवाना) लायसन्स (Provisional License) बाबत देण्यात आलेल्या ‘स्टेटस स्को’ बद्दल माहिती देत आम्हाला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रॅपिडोने केली होती. परंतु न्यायालयाने ‘स्टेटस स्को’ ची 31 मार्च रोजी एक महिन्याभरापूर्तीच देण्यात आली असल्याची सांगत, अता प्रवासी वाहतूक करायची असेल तर पक्का परवाना बंधनकारक असल्याचे सांगितले. (Pune Ola- Uber)

 

पक्या परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी सर्वांना 20 एप्रिल 2023 ही मुदत दिली आहे. या मुदतीत ओला, उमेर सर्वांनी पक्क्या परवान्यासाठी अर्ज करायचा आहे. राज्य सरकारनेही (State Government) यासंदर्भात धोरण ठरवून कार्यवाही करावी, असे न्यायालयाने सांगितले. याबाबतचा निर्णय सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (Chief Justice D.Y. Chandrachud), न्यायाधीश पी.एस. नरसिमा (Judge P.S. Narasimha) आणि न्यायाधीश जे.बी. पारडीवाला (Judge J.B. Pardiwala) यांच्या खंडपीठाने दिला. 20 एप्रिल 2023 पर्यं सर्वोच्च न्यायालयाने अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. यानंतर ज्यांच्याकडे वैध परवाना नसेल, अशा वाहनांवर परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.

‘स्टेटस स्को’ म्हणजे नेमकं काय?
राज्यातील प्रत्येक शहराच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अर्थात आरटीओने (RTO) पूर्वी ओला,
उबेर यासारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रोव्हिजनल लायसन्स दिले होते.
त्यावेळी उबेर सुप्रीम कोर्टात गेली होती. कोर्टाने तात्पुरत्या स्वरुपातील परवाने जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर आत्तापर्यंत मिळालेल्या स्टेटस स्को मुळे ओला, उबेरची प्रवासी सेवा ही प्रोव्हिजनल सायसन्सवर सुरु आहे.

 

Web Title :- Pune Ola- Uber | ola uber will need a firm license for passenger transport temporary license now closed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात भाजपचं टेन्शन वाढलं? ‘किंगमेकर’ ची प्रचारातून माघार

Pune Accident News | पुणे-नगर रोडवर डॉक्टर दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात, महिला डॉक्टरचा मृत्यू