Pune : मुलाला दारू पाजत असल्याच्या कारणावरून दोघांकडून एकाला मारहाण, बंडगार्डन परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मुलाला दारू पाजत असल्याच्या कारणावरून दोघांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना बंडगार्डन भागात घडली आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. याप्रकरणी कचरू जोगदंड आणि त्यांचा मुलगा सागर या दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय निघाटे (वय 32) हे जखमी झाले आहेत. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय व जोगदंड हे एकाच परिसरात राहतात. फिर्यादी हा कचरू यांच्या एका मुलाला दारू पाजत असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत त्यांना विजयबाबत संशय व राग होता. दरम्यान, सोमवारी फिर्यादी हे सायंकाळी कामावरून घरी निघाले होते. यावेळी या दोघांनी इस्कॉन मंदिर खान रोड याठिकाणी त्यांना गाठत मुलाला का दारू पाजतो, याची विचारणा केली. यातून त्यांच्यात वाद झाले. वेळी वडील व भाऊ यांनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.