Anil Deshmukh | अनिल देशमुखांची जेलमध्ये प्रकृती बिघडली, जे.जे. रुग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शंभर कोटी वसूली प्रकरणात (Recovery Case) अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री (Maharashtra Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) प्रकृती बिघडली आहे. अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये आहेत. या दरम्यान यांची आज जेलमध्ये प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) जेलमध्ये सकाळी 11 वाजता चक्कर येवून पडले आहेत. त्यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जे.जे. रुग्णालयात (J.J. Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. पण चक्कर येवून पडल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. देशमुख यांना याआधी देखील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना खांद्याचं दुखणं वाढत होतं. तसेच त्यांना वेगवेगळ्या व्याधीदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी जे जे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आजच्या घटनेसंदर्भात प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

अनिल देशमुख यांच्यावरील आरोप काय?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai Police Commissioner Parambir Singh) आणि
सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी 100 कोटी खंडणी (Extortion) गोळा करण्यास सांगितल्याचे आरोप आहेत.
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करुन
सीबीआय चौकशीचे (CBI Investigation) आदेश दिले होते.
सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने (ED) देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती.
अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh | Former maharashtra home minister and ncp leader anil deshmukh
admitted in jj hospital after he falls in arthur road jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा