
Pune Patit Pawan Sanghatana | डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन आक्रमक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Patit Pawan Sanghatana | पुणे महानगरपालिकेद्वारा Pune Municipal Corporation (PMC) संचलित डॉ. शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना (Dr Shyamaprasad Mukherjee Arogya Yojana) पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती . मागील वर्षभरात तब्बल 47 हजार हुन अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु निधी नसल्याचा कारण देत या अर्थसंकल्पात निधी न देता हि आरोग्यविषयक योजना बंद करून पुणेकर नागरिकांच्या आरोग्य वेठीस धरण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरु आहे. (Pune Patit Pawan Sanghatana)
कोरोना (Corona) रुपी समस्येच घोंघावणारा वादळ आता कुठे कमी झालं असताना . संपूर्ण जगाला आरोग्यविषयक यंत्रणा सक्षम करण्याचा एवढा मोठा धडा दिलेला असताना देखील पुणेकरांच्या आरोग्याशी निगडित योजनेचा प्रशासकीय बळी दिला जातो हि शरमेची बाब आहे.
स्मार्ट सिटी (Pune Smart City) आणि G20 साठी सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करणाऱ्या
पालिकेला एक अत्यंत उपयुक्त आणि आरोग्याशी निगडित योजना निधी अभावी बंद पडताना लाज कशी वाटत नाही.
या योजनेचा बळी देताना आयुक्तांना जनाची नाहीतर मनाची लाज आहे का ?
पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली डॉ. शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना आठवड्याभरात कार्यान्वित नाही
झाली तर पालिका आयुक्तांना पतित पावन पुण्यात फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा आज पालिका आयुक्तांना देण्यात आला.
यावेळी पतित पावन संघटना जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे (Dinesh Bhilare), कामगार महसंघाचे रवींद्र भांडवलकर (Ravindra Bhandwalkar),
प्रसाद वाईकर (Prasad Waikar), योगेश वाडेकर (Yogesh Wadekar), यादव पुजारी (Yadhav Pujari),
विजय क्षीरसागर (Vijay Kshirsagar), सौरभ पवार (Saurabh Pawar) आदी पढदिकारी उपस्थित होते.
Web Title :- Pune Patit Pawan Sanghatana | Pune Patit Pawan Sanghatana is aggressive to start Dr. Shamaprasad Mukherjee Arogya Yojana health scheme in pune municipal corporation pmc
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | पुणे पोलिसांकडून बनावट निकाहनामा बनवून तरूणीची बदनामी करणार्याला बुलढाण्यातून अटक
Awami Mahaz Pune | आझम कॅम्पस : ‘अवामी महाज’ च्या ईद मिलन मध्ये रंगली संगीत संध्या !