Pune Pimpri Chinchwad ACB Trap News | पुणे : लाच स्वीकारताना पुण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad ACB Trap News | अपघातातील गाडी परत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच (Pune Bribe Case) घेताना चिखली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र लक्ष्मण राजे ASI Narendra Laxman Raje (वय-54) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Pune Pimpri Chinchwad ACB Trap News) रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी (दि.17) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) करण्यात आली.

याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी (Pune Pimpri Chinchwad ACB Trap News) कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघाताबाबत चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या अपघातातील गाडी तक्रारदार ह्यांना परत करण्यासाठी यातील नरेंद्र राजे यांनी सुरुवातीला दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीत एक लाख रुपये ठरले. त्यापैकी 13 डिसेंबर रोजी 15 हजार रुपये व 15 डिसेंबर रोजी 55 हजार रुपये नरेंद्र राजे यांनी घेऊन उर्वरित पैशांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कार्य़ालयात तक्रार दिली.

पुणे एसीबीच्या (Pune ACB) पथकाने प्राप्त तक्रारीची शनिवारी पडताळणी केली असता सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र राजे यांनी 70 हजार रुपये लाच स्वीकारून 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने रविवारी चिखली पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना नरेंद्र राजे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नरेंद्र राजे यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav),
पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (PI Prasad Lonare)
पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, सुराडकर, चव्हाण यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नागपूरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट; ९ कामगारांचा मृत्यु, संपूर्ण इमारत उध्वस्त

महिलेच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेकडून दोघांना अटक, जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस