Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेकडून दोघांना अटक, जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेच्या चेहऱ्यावर कोणत्यातरी कठीण वस्तूने मारहाण करून खून (Murder) करुन फरार झालेल्या दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट पाचच्या (Unit -5) पथकाने कोणताही पुरवा नसताना अटक (Arrest) करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. ही घटना 9 डिसेंबर रोजी बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम चौकात गोयल गार्डन समोर (Goyal Garden) घडली होती. अटक केलेल्या आरोपींकडून जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

रविसिंग राजकुमार चितोडिया (वय-29 सध्या रा. येवले वाडी, मुळ रा. वृंदावननगर, नाशिक), विजय मारुती पाटील (वय-32 रा. संजीवनी पोलीस कॉलनी, भोईसर पुर्व) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

गंगाधाम चौक परिसरात गोयल गार्डनजवळ जय संतोषी माँ आयुर्वेदिक कॅम्प बिबवेवाडी येथील कापडी तंबूत 40-45 वर्षीय एक महिला मृतावस्थेत आढळली होती. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना युनिट पाच च्या पथकाने 55 किमी अंतरावरील 240-250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पथकाने बारकाईने तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडे असलेली दुचाकी आणि मोबाईल बाबत तपास केला असता दुचाकी कामशेत पोलीस ठाण्याच्या (Kamshet Police Station) हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. तर मोबाईल कामशेत व नाशिक येथून चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 7 डिसेंबर रोजी रात्री पालावर झोपण्यासाठी आला. त्यावेळी पालामध्ये गंगाखेड येथील एक महिला झोपली होती. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी आरोपी सकाळी कात्रज चौकात दारु पिण्यासाठी गेला. त्याठिकाणी विजय पाटील याच्यासोबत त्याची ओळख झाली. तेथून येवले वाडी येथे आले असता पाटील तोलजाऊन पडला. त्यामुळे त्याच्यावर उपचार करुन 9 डिसेंबर रोजी रात्री एक वाजता पुन्हा पालावर झोपण्यासाठी आले.

रात्री तीनच्या सुमारास महिलेसोबत जबरदस्ती केली असता तिने विरोध केला. त्यावेळी महिलेचे नख रविसिंग याला लागले. त्यानंतर विजय पाटील याने महिलेल पकडले. तर आरोपी रविसिंग याने त्याठिकाणी पडलेला हातोडा महिलेच्या डोक्यात मारला. महिला बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. गुन्हे शाखेच्या युनिट पाच च्या पथकाने दोन आरोपींना अटक करुन खुन आणि जबरी चोरी असे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आणून 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (PI Mahesh Bolkotgi),
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar),
पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote),
उपनिरीक्षक चैत्राली गपाट (PSI Chaitrali Gapat) पोलीस अंमलदार आश्रुबा मोराळे,
राजस शेख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्याद पृथ्वीराज पांडुळे,
अकबर शेख, दया शेगर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, शशिकांत नाळे, अमित कांबळे, राहुल ढमढेरे,
पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे व संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक