Pune Pimpri Chinchwad Accident News | भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू, नवले ब्रिज येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Accident News | पुण्यातील वडगाव येथील नवले ब्रिज अपघाताचा (Navale Bridge Accident) हॉटस्पॉट ठरला आहे. मागील अनेक दिवसांपासून याठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नवले ब्रिजवर गुरुवारी (दि.25) रात्री बाराच्या सुमारास झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एका ट्रक चालकाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Accident News)

श्रीकांत बाबाराव वानखेडे (वय-34 रा. आंबेगाव कात्र बायपास) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी ट्रक चालक इस्माईल उस्मान बंडुवाले (वय-30 रा. आलुरता, उमरगा, उस्मानाबाद) याच्यावर आयपीसी 279 सहा मोटार वाहन कायदा 184, 119/177 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सुदर्शन उत्तेश्वर मुंडे (वय-34 रा. विघ्नहर्ता वास्तु, आंबेगाव पठार) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या ताब्यातील ट्रक कात्रजकडून येणाऱ्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात घेऊन येत होता.
नवले ब्रिज येथील सिग्नलजवळ मयत श्रीकांत वानखेडे हा रस्ता ओलांडत होता.
त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची धडक श्रीकांत याला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले, धायरी येथील प्रकार

Pune Congress News | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन; लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट – माजी नगरसेवक दत्ता बहिरट

Manoj Jarange Patil | जरांगे यांनी सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या, तोपर्यंत सर्व शिक्षण मोफत करा, सरकारने रात्रीपर्यंत…

Deepak Kesarkar | जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघाला?, मंत्री केसरकरांनी केले मोठे वक्तव्य