Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते…’ पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | माहेरच्या लोकांकडे जास्त लक्ष देते याचा राग मनात धरुन दोरीने गळा आवळून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केला (Attempt To Murder). हा प्रकार मुळशी (Mulshi) तालुक्यातील बावधन बुद्रुक (Bavdhan Budruk) येथे कांबळे वस्तीत शुक्रवारी (दि.5) दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे.

याबाबत रेखा श्रीरंग कापसे (वय- 27 रा. कांबळे वस्ती, बावधन बुद्रुक, ता. मुळशी मुळ रा. उमापुर ता. गेवराई जि. बीड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली. यावरुन श्रीरंग पांडुरंग कापसे (रा. कांबळे वस्ती, बावधन बुद्रुक, ता. मुळशी) याच्या विरोधात आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल केला. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरंग कापसे हा फिर्यादी रेखा यांचा पती आहे.
आरोपीने रेखा यांच्यावर संशय घेऊन तू जास्त तुझ्या माहेरच्यांकडेच लक्ष देते म्हणत आरोपीने दोरीच्या सहाय्याने गळा आवळला.
तसेच रेखा यांच्या छातीवर पाय ठेवला. त्या तडफडत असताना ही आरोपीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला.
फिर्य़ादी यांनी कशीबशी आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत जीव वाचवला.
आरोपीने रेखा यांचा गळा आवळून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झोल करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”

Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन