Pune Pimpri Chinchwad Crime News | महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, पुणे कॅम्प परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हातातील फुटलेली काचेची बाटली खाली टाकण्यास सांगितले असता महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या (Pune Police) हातातील काठी हिसकावून घेत मारहाण (Beating) केली. तसेच फुलेली काचेची बाटली गळ्याजवळ आणून जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. ही घटना शनिवारी (दि.30) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पुणे कॅम्प (Pune Camp) येथील गणपती मंदिर व मारुती मंदिराच्या जवळील मोकळ्या जागेत घडली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सोनु मनोज शिरसवाल (रा. वानवडी गाव, पुणे) याच्यावर आयपीसी 353, 332, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार (Police Constable) विजया सुभाष वेदपाठक (Vijaya Subhash Vedpathak) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजया वेदपाठक या सोलापूर बाजार (Solapur Bazaar) येथे मार्शल म्हणून कर्तव्यावर होत्या. शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी सोनु शिरसवाल हा फुटलेली काचेची बाटली हातात घेऊन जाताना दिसला. फिर्यादी यांनी आरोपीला थांबवून हातातील फुटलेली काचेची बाटली खाली टाकण्यास सांगितले असता आरोपीने शिवागाळ केली. त्यावेळी विजया वेदपाठक यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोपीचे शुटिंग घेत असताना आरोपीने त्यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली.

तसेच काठीने फिर्यादी यांच्या हातावर मारुन जखमी करुन हातातील मोबाईल हिसकावून घेत रस्त्यावर फेकून दिला. फिर्यादी यांनी आरोपीच्या हातातील काठी परत घेतली. त्यावेळी आरोपीने हातातील फुटलेली काचेची बाटली फिर्य़ादी यांच्या गळ्याजवळ अणून ‘मी तुला खल्लास करुन टाकीन’ अशी धमकी देऊन पळून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डेंगळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | धर्मांतरण, काळ्या जादुच्या आरोपावरुन वादग्रस्त धर्मगुरुला अटक; नववर्षाच्या पहाटे कारवाई

चालत्या रिक्षामध्ये तरुणीसोबत अश्‍लील चाळे, आरोपी तरुणावर FIR; हडपसर परिसरातील घटना