Pune Pimpri Chinchwad Crime News | चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडे 6 कोटींची फसवणूक, ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्यूशन्स कंपनीच्या मालक व एजंटवर MPID

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनीमध्ये गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. मात्र, परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत न करता 6 कोटी 65 लाख 34 हजार 310 रुपयांचा अपहार केला. फसवणुकीचा (Fraud) हा प्रकार निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील (Bhakti Shakti Chowk) ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्यूशन्स प्रा. लि. (Trade World Market Solutions Pvt. Ltd.) कंपनीत 21 डिसेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सुनील बगाराम जाधव (वय-34 रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, निगडी, प्राधिकरण) यांनी शनिवारी (दि.23) निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संतोष अंकुशराव चव्हाण Santosh Ankushrao Chavan (रा. इलिगंट रेसिडेन्सी, जुना मुंबई-पुणे महामार्ग, निगडी), महिला आरोपी, संकेत भागवत (रा. दापोडी), दिपक शिंदे (रा. चऱ्होली) यांच्यावर आयपीसी 420, 406, 409, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि संतोष चव्हाण हे ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनीचे मालक आहेत. तर संकेत भागवत आणि दीपक शिंदे हे कंपनीचे एजंट आहेत. कंपनीचे मालक आणि एजंट यांनी संगनमत करुन फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी कंपनीत गुंतवलेल्या रक्कमेवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. यानंतर फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवलेली एकत्रित रक्कम 6 कोटी 65 लाख 34 हजार 310 रुपयांचा अपहार केला. फिर्यादी जाधव यांनी आरोपींनी आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

फिर्यादी जाधव यांच्या तक्रारीवरुन निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने
हा गुन्हा पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे (Economic Offence Wing (EOW) वर्ग केला आहे.
पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘पोलिसात तक्रार केली तर सुटल्यावर मर्डर करीन’, दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार; चिंचवडमधील घटना