Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘पोलिसात तक्रार केली तर सुटल्यावर मर्डर करीन’, दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार; चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन- Pune Pimpri Chinchwad Crime News | दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करुन, चार जणांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार (Stabbing) करुन गंभीर जखमी केले. तसेच लोकांमध्ये दहशत पसरवली. ‘तू पोलिसांत तक्रार केली तर सटून आल्यावर तुझा मर्डर करीन’ अशी धमकही दिली. हा प्रकार चिंचवड येथील लिंक रोडवरील पत्राशेड समोरील मोकळ्या जागेत शुक्रवारी (दि.22) रात्री साडे दहाच्या सुमारास घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत प्रमोद वामन ओगले (वय-27 रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अमन शेख, आकाश मोरे, आकाश राजु कांबळे, अतुल भोसले (सर्व रा. पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 326, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. शुक्रवारी रात्री ते राहत्या घरी जात होते. त्यावेळी आरोपी आकाश कांबळे याने ‘दारुला पैसे दे’, असे म्हणून प्रमोद यांना धक्काबुक्कीने मारहाण (Beating) केली. अमन शेख याने फिर्यादी यांच्या डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी केले. आकाश कांबळे याने स्टीलचा पाईप डोक्यात मारुन प्रमोद यांना जखमी केले. त्यावेळी प्रमोद यांनी मदतीसाठी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने पत्राशेड मधील लोक बाहेर आले.

त्यावेळी अमन शेख याने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. ‘कोणी पण इथे येऊ नका, जो कोणी याला मदत करील एकाएकाला मी मारीन, मी अगोदर खूप लोकांना मारले आहे, खूप गुन्हे केले आहेत. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.
मी इथला भाई होणार आहे. पूर्ण पिंपरी मला भाई म्हणून ओळखते.
माझे कोणी काही वाकडे करु शकत नाही’ असे म्हणून शेख याने लोकांमध्ये दहशत पसरवली.

त्यामुळे लोक घाबरुन घरात जाऊन दरवाजे खिडक्या बंद करुन बसले.
‘तू जर माझी पोलिसांत तक्रार केली तर मी सुटल्यावर तुझा मर्डर करीन’
असे म्हणून अमन शेख याने फिर्यादी प्रमोद यांना धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश चव्हाण (PSI Nilesh Chavan) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तक्रार दिल्याच्या कारणावरुन बांधकाम व्यावसायिकाचे घर पेटवले, तळेगाव दाभाडे येथील घटना

हळदीच्या कार्यक्रमात राडा, नवरदेवावर कोयत्याने वार; तीन जणांना अटक, वाकड परिसरातील घटना

10 हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह, शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, चार जणांना अटक; कर्वेनगर मधील घटना