Pune Pimpri Chinchwad Crime News | मटणाची उधारी न देता 61 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलसाठी उधारीवर मटन देणाऱ्या मटण (Mutton) व्यापाऱ्याची उधारी न देता फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी बागबान हॉटेलच्या (Bagban Hotel) मालकावर लष्कर पोलीस ठाण्यात (Pune Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 ते 2023 या कालावधीत पुणे कॅम्प (Pune Camp) येथील छत्रपती शिवाजी मार्केट येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत शादाफ निजाम पटेल Shadaf Nizam Patel (वय43 रा. जान मोहम्मद स्ट्रीट, पुणे कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन बागबान हॉटेलचे मालक अफजल युसूफ बागवान Afzal Yusuf Bagwan (वय-65 रा. कौसरबाग, कोंढवा), अहतेशाम अयाज बागवान Ahtesham Ayaz Bagwan (वय-34) यांच्यावर आयपीसी 406, 420, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा मटन विक्रीचा व्यवसाय आहे.
आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन मटनाची ऑर्डर दिली.
फिर्यादी यांनी बागबान हॉटेलमध्ये क्रेडिटवर 2 कोटी 91 लाख 81 हजार 815 रुपयांचे मटन, चाप, खिमा इत्यादी
मटणाचा पुरवठा केला. मात्र, त्यापैकी 2 कोटी 30 लाख 19 हजार 675 हजार रुपये आरोपींनी फिर्यादी यांना परत केले.
उर्वरित 61 लाख 62 हजार 140 रुपये दिले नाहित. फिर्यादी यांनी वारंवार पैशाची मागणी केली.
परंतु आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे (PSI Bansode) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बेरोजगार तरुणाने पत्रकारांमध्ये शिरून चंद्रकांत पाटीलांना विचारला प्रश्न, पण शंका येताच….

Pimpri Chinchwad Police News | ‘हॉटेल सांबार’ फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर