Pune Pimpri Chinchwad Crime News | शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा, औंध मधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनीत काम करणाऱ्या महिलेला पगार दुप्पट करण्याचे आमिष देवून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करुन विनयभंग (Molestation Case) केला. हा प्रकार जुलै 2023 पासून आजपर्य़ंत औंध येथील एका कंपनीत घडला. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) मंगळवारी (दि.2) फिर्याद दिली आहे. यावरुन रतनेश डांगी Ratnesh Dangi (वय-45 रा. पंचशील टॉवर्स, खराडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(अ), 354(ड), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच ऑफिसमध्ये काम करतात. आरोपीने फिर्यादी महिलेचा मागील सहा महिन्यापासून पाठलाग करुन मानसिक व शारीरिक त्रास दिला. आरोपीने फिर्यादी यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याच्या केबिनमध्ये बोलून घेऊन महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शारीरिक स्पर्श केला. तसेच महिलेला पगार दुप्पट करुन देण्याचे आमिष देवुन तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली (Physical Relationship). याबाबत कोणाला काही सांगितले तर मारुन टाकण्याची धमकी (Threats to kill) आरोपीने फिर्यादी यांना दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जाहिरातींच्या हक्कांच्या बदल्यात शौचालयांची देखभाल दुरूस्ती; प्रशासनाने घनकचरा विभागाचा प्रस्ताव रद्द केला

बेकायदा बांधकामे आढळल्यास तातडीने कारवाईचे आदेश

Pune PMC News | पुणे महापालिकेचा कारभार होतोय ‘डिजिटल’ ! 60 पैकी 16 विभागात ई ऑफिस प्रणाली कार्यन्वीत – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियाचे आरक्षण टाकणार

‘मतांचे’ राजकारण आणि अर्थकारणामुळे पुणे शहर होतेय वेगाने बकाल