Pune Pimpri Chinchwad Crime News | भाडे नाकारल्याने रिक्षाचालकावर कोयत्याने वार, चिखली परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रिक्षाचे भाडे नाकारल्याच्या कारणावरुन एका रिक्षाचालकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तर रिक्षाचालकाला वाचवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याची घटना चिखली परिसरात घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.8) रात्री साडे अकराच्या सुमारास पुर्णानगर येथील एका मेडिकल समोर घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रिक्षाचालक बालाजी भानुदास गायकवाड (वय-54 रा. निसर्ग हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) बुधवारी (दि.10) फिर्याद दिली आहे. यावरून आदित्य आडे, संजय मरगुडे यांच्यावर आयपीसी 394, 397, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व त्यांचा मेहुणा हे पुर्णानगर येथील एका मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी रिक्षातून गेले होते. त्यावेळी मेडिकल समोर उभ्या असलेल्या आरोपींनी फिर्यादी यांना केएसबी चौकात सोडण्यास सांगितले. मात्र, फिर्यादी यांनी सोडण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी संजय मरगुडे याने त्याच्या हातातील पाण्याची बाटली फिर्यादी यांच्या डोक्यात मारून कोयत्याने डोक्यात वार केला. तर आरोपी आदित्य आडे याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील 3300 रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन रिक्षाची चावी काढून फेकून दिली. यावेळी फिर्य़ादी यांचा मेहुणा वाचवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बारवकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, आरोपींचं ‘मुळशी कनेक्शन’ उघड

साडेचार वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण, नाराधम बापाला अटक; खराडी परिसरातील प्रकार

आरोपीला भेटू न दिल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, खडकी पोलीस ठाण्यातील प्रकार

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन गाडीवर दगडफेक, हडपसर परिसरातील घटना; 7 जणांना अटक

ACB Trap News | 5 लाखाच्या लाचेची मागणी ! फोन पे वर लाच स्वीकारताना पुण्यातील वकील अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

दुकान बंद करण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, विमानतळ पोलिसांकडून 4 मुलींची सुटका