Pune Pimpri Chinchwad Crime News | स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, विमानतळ पोलिसांकडून 4 मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Pimpri Chinchwad Crime News | विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitute Business) प्रकार विमानतळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत 25 ते 30 वयोगटातील चार तरुणींची सुटका करण्यात आली असून स्पा मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) स्पा मालक सतिश सकनुरे (वय-32 रा. लातूर), स्पा मॅनेजर रोषनी सुरेश पाटील (वय-34 रा. वाघोली) यांच्या विरुद्ध आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक समु रामकिशोर चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास विमाननगर परिसरातील ईस्ट कोर्ट बिल्डिंगमधील शांती स्पा येथे करण्यात आली.

विमाननगर परिसरातील ईस्ट कोर्ट बिल्डींगमधील शांती स्पा सेंटर (Shanti Spa Center) येथे वेश्या व्यवसाय
सुरु असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री
करुन घेतली. त्यानंतर शांती स्पा सेंटर येथे छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले.
आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

साडेचार वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण, नाराधम बापाला अटक; खराडी परिसरातील प्रकार

आरोपीला भेटू न दिल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, खडकी पोलीस ठाण्यातील प्रकार

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन गाडीवर दगडफेक, हडपसर परिसरातील घटना; 7 जणांना अटक