Pune Pimpri Chinchwad Crime News | हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन तरुणाला मारहाण करुन दात पाडले, खराडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चारचाकी गाडी रोडवरुन वेडीवाकडी चालवत असल्याने तरुणाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने तीन अनोळखी व्यक्तींनी तरुणाला बेदम मारहाण (Beating) केले. यात तीन दात पडून तरुण जखमी झाला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.1) पहाटे पावणे चारच्या सुमारास खराडी-मुंढवा बायपास रोडवर (Kharadi-Mundhwa Bypass Road) घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अमित बबन जायभाय (वय-29 रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) याने चंदननगर पोलीस ठाण्यात
(Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तीन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 325, 504, 506,
34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित व त्याचा मित्र हे चारचाकी गाडी मधून फेरफटका मारण्यासाठी कोरेगाव
कल्याणी नगर, नगर लोहगाव रोडने फिनिक्स मॉल (Phoenix Mall) येथून खराडी बायपास चौकाकडे जात होते.
साडीतीन वाजण्याच्या सुमारास ते एका दुकानासमोर आले असता एक चारचाकी चालक रोडवरुन झिगझॅग पद्धतीने कार चालवत होता. तर गाडीतील इतर दोन मुले दराच्या काचेतून तोंड बाहेर काढून मोठ मोठ्याने ओरडत होती.
त्यामुळे अमित याने गाडीचा हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने आरोपींनी त्याला शिवीगाळ केली.

त्यानंतर अमित आरोपीच्या गाडीच्या पुढे जाऊन एका चाहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबला.
त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. ‘याला लई माज आलाय, लई हॉर्न वाजवतो, याला मारुन टाका’ असे म्हणत
अमितला मारहाण केली. तसेच त्याच्या तोंडावर लाथ मारल्याने अमितचे वरचे तीन दात पडले.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अमित जायभाय याने गुरुवारी (दि.4) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar | ‘गृहमंत्र्यांनी या महाशयांवर कठोर कारवाई करावी’, रुपाली चाकणकरांचा आव्हाडांवर संताप

NCP Chief Sharad Pawar | ”मोदी सांगतात गॅरंटी, पण ती काही खरी नाही…”, शरद पवारांची खोचक टिका

Pune PMC News | पुणे महापालिकेने नोटीसेस दिलेल्या अनधिकृत बांधकामांचे व्यवहार करु नयेत; असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस् संघटनेचे सदस्यांना आदेश