Pune Pimpri Chinchwad Crime News | Apple कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप (Apple Laptop) चोरी करुन त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक लॅपटॉप, दोन मोबाईल फोन असा एकूण 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्दमाल जप्त केला आहे. ही कारवाई कात्रज तलाव येथे करण्यात आली. रोहीत शंकर साठे (वय-20 रा. खोपडेनगर, कात्रज) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत चोरींच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने तपास पथकाकडून गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार निलेश खैरमोडे व विठ्ठल चिपाडे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती कात्रज तलाव येथे चोरीचा लॅपटॉप विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने कात्रज तलाव येथे जाऊन रोहित साठे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अॅपल कंपनीचा 4 लाख 50 हजार रुपयांचा महागडा लॅपटॉप आणि 25 हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior PI Vinayak Gaikwad), पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक (PI Vijay Puranik),

पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर (PI Girish Dighavkar),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal),
पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta),
पोलीस अंमलदार निलेश खैरमोडे, विठ्ठल चिपाडे, शैलेश साठे, सचिन सरवाले, चेतन गोरे,
निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांना का द्यावं लागलं स्पष्टीकरण? ”बाहेर असल्याने शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही कुणी गैरअर्थ…”

घर मालकाकडून भाडेकरु महिलेचा विनयभंग, धनकवडी परिसरातील घटना

Shiv Sena MLA Aaditya Thackeray | महाराष्ट्राला आदित्य ठाकरेंचं खुलं पत्र, केंद्र आणि राज्याच्या कारभारावर ओढले आसूड, ”गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय…”

लंडन ते मुंबई प्रवासात 152 ग्रॅम सोने गायब, पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल