Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला सख्या भावाचा खून; जखमी भावाला रस्त्याच्या कडेला दिले टाकून, उपचाराअभावी मृत्यु, वारजेमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सूस गाव येथील घरी जमिनीचा सातबारा मागण्याकरीता कुऱ्हाड घेऊन आलेल्या लहान भावाला लाकडी बांबुने मारहाण (Beating) करुन त्याचा खून (Pune Murder Case) केला. त्यानंतर त्याचा मृतदेह रात्री वारजे येथील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर टाकून देण्याचा प्रकार समोर आला आहे. दोन पोलीस ठाण्यातील (Pune Police) हद्दीमुळे खूनाचा गुन्हा तब्बल एक दिवसांनंतर दाखल झाला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

लक्ष्मण गोबरिया रामावंत Laxman Gobaria Ramawant (वय ३५) असे खून (Murder In Pune) झालेल्याचे नाव आहे. याबाबत संतोष विश्वावत ऊर्फ पवार Santosh Vishwat alias Pawar (वय १९, रा. शिवणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिमराम गोबरिया रामावत (रा. सूस गाव) याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

स्वत:च्या भावाला गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याने उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची आई, बहिण गंगा रामावत, दाजी लक्ष्मण रामावत त्यांच्या मुलांसह शिवणे येथे राहतात. मिळेल तेथे मजुरी काम करतात. लक्ष्णम रामावत यांचा मोठा भाऊ सूसगावातील पाटीलनगर येथे राहतात. ते मुळचे तेलंगणा येथील धनवाडा तालुक्यातील हनुमान तांडा येथील राहणारे असून त्यांच्या गावाकडील जमिनीवरुन दोघा भावांमध्ये वाद आहेत. मागील ९ दिवसांपूर्वी दोघांमध्ये वारजे येथील मजूर अड्ड्यावर जोरात भांडणे झाली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

फिर्यादी हे ३ जानेवारी रोजी सकाळी मजुरीसाठी जात असताना त्यांच्या चुलत बहिणीचा फोन आला. त्यात लक्ष्मण रामावत हे वारजे येथील सर्व्हिस रोडला बेशुद्धावस्थेत पडले असल्याचे सांगितले. फिर्यादी हे तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

त्यानंतर फिर्यादी यांनी याची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच ते लक्ष्मण यांचा मोठा भाऊ रिमराम याला जाऊन भेटले
व लक्ष्मणच्या मृत्युची माहिती दिली. तेव्हा रिमराम याने सांगितले की, २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता लक्ष्मण जमिनीचा
सातबारा मागण्यसाठी हातात कुर्‍हाड घेऊन सूसगावातील घरी आला होता. त्याने दारु पिली होती.
जमिनीचा सातबारा नाही दिला तर कुर्‍हाडीने मारुन टाकीन, अशी धमकी देऊन अंगावर धावून आला.
मी त्याच्या हातातील कुर्‍हाड काढून घेऊन ती घराच्या पत्र्यावर टाकली.
रागाच्या भरात तेथेच पडलेल्या लाकडी बांबुने लक्ष्मण याला मारहाण केली. त्यात लक्ष्मण जखमी झाल्याने निपचित पडला.
सायंकाळ झाल्यानंतर त्यास कसेतरी उठवले. रात्री ९ वाजता रिक्षामध्ये टाकून वारजे येथील पुणे -बंगलुरु महामार्गाच्या
सर्व्हिस रोडवर बाजूला बसवून घरी परत आलो. मी स्वत:हून हिंजवडी पोलीस ठाण्यात हजर होणार आहे, असे सांगितले.
फिर्यादी यांनी हे वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले.

वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तो हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे लक्षात आल्यावर हिंजवडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे: दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रॉडने मारहाण, तिघांना अटक

तरुणीला मारहाण करुन अश्लील शिवीगाळ, विनयभंग केल्याप्रकरणी एकावर FIR; हडपसर परिसरातील घटना

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण उठविण्यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष

पैसे चोरल्याच्या संशयावरून कामगाराचा खून, एकाला अटक; वडगाव मधील घटना