Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडी काढण्याच्या कारणावरुन तरुणाला मारहाण, हिंजवडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पार्क केलेली गाडी काढत असताना आडवी असलेली कार काढण्यास सांगितल्याच्या कारणावरुन एकाने तरुणाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केली. हा प्रकार शनिवारी (दि.21) रात्री साडे आठच्या सुमारास क्रिस्टल मार्केट माण फेज तीन येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत दिपक राजकुमार पवार (वय-31 रा. मेगापॉलीस मिस्टीक, हिंजवडी फेज-3) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली. यावरून बलेनो (एमएच 14 जी. आर. 1177) चालकावर आयपीसी 325, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या चारचाकी गाडीतून क्रिस्टल मार्केट येथे गेले होते.
फिर्यादी यांनी त्यांची गाडी पार्क करुन चहा पिण्यासाठी गेले होते.
चहा पिवून घरी जाण्यासाठी कार जवळ आले असताना त्यांच्या गाडीच्या पाठीमागे रोडवरती कोणीतरी बलेनो गाडी पार्क केली होती.
यावेळी फिर्यादी यांनी त्यांना गाडी काढण्यास सांगितले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
यामध्ये फिर्यादीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खटाळ करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar | उद्या ED कार्यालयात माझ्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे येणार, रोहित पवारांची माहिती, कार्यकर्त्यांना म्हणाले…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत काँग्रेस प्रभारींनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका, ”यांच्याशी युती केल्याचा आज मलाही पश्चाताप होतोय…”

पिंपरी : ‘तु माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?’ पत्नीला लाटण्याने मारहाण, पती विरोधात FIR

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, सासरच्या लोकांकडून जावयाला दगडाने मारहाण; कोंढवा परिसरातील प्रकार