Pune Pimpri Chinchwad Crime News | स्वर्गीय माजी आमदार विनायक मेटे यांचे पुण्यातील घर बळकावण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शिवसंग्रामचे संस्थापक नेते आणि माजी आमदार स्वर्गीय विनायक मेटे (Former MLA late Vinayak Mete) यांचे विमाननगर परिसरात असलेले घर बळकावण्यचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी विनायक मेटे यांच्या सख्ख्या बहिणीसह मुलावर विमानतळ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर रोजी घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत विनायक मेटे यांचे चिरंजीव आशुषोत विनायक मेटे Ashutosh Vinayak Mete (वय-20 रा. कोरेगाव पार्क) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) शनिवारी (दि.16) फिर्याद दिली आहे. यावरुन सत्वशिला महादेव जाधव, आकाश महादेव जाधव (रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे, भिवंडी) यांच्यावर आयपीसी 448, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसंग्रामचे संस्थापक नेते आणि माजी आमदार स्वर्गीय विनायक मेटे यांचे विमाननगर (Vimannagar) परिसरातील गंगापुरम हौसिंग सोसायटीच्या ए बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. फिर्यादी आशुतोष मेटे यांच्या वडिलांनी खरेदीखत करुन हा फ्लॅट घेतला आहे. विनायक मेटे यांचे अपघाती निधन (Accidental Death) झाल्यानंतर हा फ्लॅट फिर्य़ादी व त्यांच्या आईच्या ताब्यात आहे. असे असताना विनायक मेटे यांची सख्खी बहिण सत्वशिला जाधव व त्यांचा मुलगा आकाश जाधव यांनी 15 डिसेंबर रोजी फ्लॅटचे कुलुप तोडून अनधिकृत पणे फ्लॅटमध्ये प्रवेश करुन ताबा घेतला. याबाबत माहिती मिळताच आशुतोष मेटे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळ्ळुरे (PSI Kollure) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : लाच स्वीकारताना पुण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट; ९ कामगारांचा मृत्यु, संपूर्ण इमारत उध्वस्त

महिलेच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेकडून दोघांना अटक, जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

धारावी पुर्नविकास विरोधी मोर्चात उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात, ‘अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना…’

9 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन

”मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजी”, सूत्रसंचालक असे म्हणताच पंतप्रधान पाहतच राहिले, VIDEO व्हायरल