Pune Pimpri Chinchwad Crime News | दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने घरच पेटवलं, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आई-वडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने घर पेटवून दिल्याची (Set Fire to House) धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 4) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (PCPC Police) आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत उत्तम किसन शिंदे (वय 67, रा. शिवतेजनगर, चिखली प्राधिकरण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास उत्तम शिंदे (वय 43) याच्या विरोधात आयपीसी 436, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास शिंदे याला दारू पिण्याचे (Drink Alcohol) व्यसन आहे.
गुरुवारी सकाळी आरोपी विकास याने आई-वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.
यावरुन त्याने आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. तरी देखील आई-वडिलांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्या विकास याने पैसे दिले नाही तर तुमचे घर जाळून बरबाद करुन टाकीन अशी धमकी दिली.
तसेच घरातील कॅलेंडर गॅसवर पेटवले आणि हॉलमधील सर्व पडद्यांना आग लावली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुदळे (PSI Kudle) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | मोठी बातमी! ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड, आमदार रोहित पवार अडचणीत

जमीन देण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार

Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गोळीबार, एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

पुणे: तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची दीड कोटींची फसवणूक, तिघांवर FIR