Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, दागिने अन् पैसेही उकळले; पुण्यातील प्रकार

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवत (Lure of Marriage) तरुणीवर बलात्कार (Pune Rape Case) करण्याच्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आलं आहे. पुण्यातही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तसेच, तिच्याकडून 94 हजार रुपये रोख आणि 17 तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर कोथरुड पोलीस (Pune Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत ठाकुर्ली, इस्ट मुंबई येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने शनिवारी (दि.23) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी प्रसाद सावंत (वय-38 रा. रामबाग कॉलनी, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 323, 406, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल केल आहे. हा प्रकार मार्च 2023 ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत ओळख केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, आरोपीने आर्थिक अडचण असल्याचे सांगून फिर्यादी यांच्याकडून 17 तोळे सोन्याचे दागिने घेतले.

तसेच 94 हजार रुपये रोख घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दागिने आणि पैशांचा अपहार केला.
फिर्यादी यांनी आरोपीकडे लग्नाबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ केली.
तरुणीने पैसे परत मागितल्याने संतापलेल्या आरोपीने तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहयक पोलीस निरीक्षक अडागळे (API Adagale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात थंडीचा कडाका वाढला; पाषाणला किमान तापमान प्रथमच 9.7 सेल्सिअसपर्यंत उतरले

नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड, जाणून घ्या हल्ल्याचे कारण