Pune Pimpri Chinchwad Crime News | वाहन चोरी करणाऱ्या दोघांना चाकण पोलिसांकडून अटक, 8 लाखाच्या 15 दुचाकी जप्त

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड परिसरात दुचाकी चोरणाऱ्या (Bike Thieves) दोघांना चाकण पोलीस ठाण्यातील (PCPC Police) विशेष पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 8 लाख रुपये किंमतीच्या 15 दुचाकी जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

योगेश तुकाराम देवकर (वय-30), दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (वय- 26 दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चाकण परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चाकण पोलिसांचे (Chakan Police Station) एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या पथकाने वाहन चोरी झालेल्या घटनास्थळापासून परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला. पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन घटनास्थळी दिसलेल्या व्यक्तींची माहिती प्राप्त केली. चाकण परिसरात दुचाकी चोरणाऱ्या योगेश देवकर व दत्तात्रय गाडेबैल हे दोन आरोपी निष्पन्न केले.

आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे सखोल चौकशी करुन चाकण पोलीस स्टेशन व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या 8 लाख रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत चाकण पोलीस ठाण्यातील 7, दिघी (Dighi Police Station) आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील (Hinjewadi Police Station) प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित सहा दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जऱ्हाड करीत आहेत.)

आरोपींकडून जप्त केलेल्या दुचाकी

  1. स्प्लेंडर (MH 14 GG 5282), 2. सीबी शाईन (MH 46 BL 9788), 3. सीडी डिलक्स (MH 14 DB 2610),
    4. स्प्लेंडर (MH 14 JT 9935). 5. स्प्लेंडर (MH 12 DV 1115), 6. यमाहा आर 15 (MH 12 RG 6378)
    7. स्प्लेंडर (MH 14 KE 5746), 8. सीडी डिलक्स (MH 17 AC 9866), 9. बजाज पल्सर (MH 14 FQ 3134),
    10. स्प्लेंडर (नंबर प्लेट नाही), 11. स्प्लेंडर (MH 14 FV 8306), 12. स्प्लेंडर (MH 12 WA 6255),
    13. सुझुकी जीए (MH 42 P 3124), 14. स्प्लेंडर (नंबर प्लेट नाही), 15. स्प्लेंडर (नंबर प्लेट नाही)

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी
(Addl CP Vasant Pardeshi), पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे (DCP Sandeep Doifode),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर (ACP Rajendra Singh Gaur) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Senior PI Ashok Kadam), पोलीस निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी
(PI Yunus Mulani), सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जऱ्हाड (API Prasannan Jarhad), विक्रम गायकवाड
(API Vikram Gaikwad), पोलीस अंमलदार संदीप सोनवणे, राजु जाधव, हनुमंत कांबळे, निखिल शेटे, नितीन गुंजाळ,
सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी, विवेक सानप, प्रतिक चव्हाण, अरुण शिंदे, महादेव बिक्कड,
माधुरी कचाटे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडे 6 कोटींची फसवणूक, ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्यूशन्स कंपनीच्या मालक व एजंटवर MPID

‘पोलिसात तक्रार केली तर सुटल्यावर मर्डर करीन’, दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार; चिंचवडमधील घटना

तक्रार दिल्याच्या कारणावरुन बांधकाम व्यावसायिकाचे घर पेटवले, तळेगाव दाभाडे येथील घटना

हळदीच्या कार्यक्रमात राडा, नवरदेवावर कोयत्याने वार; तीन जणांना अटक, वाकड परिसरातील घटना