Pune Pimpri Chinchwad Crime News | तक्रार दिल्याच्या कारणावरुन बांधकाम व्यावसायिकाचे घर पेटवले, तळेगाव दाभाडे येथील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तक्रार दिल्याच्या रागातून एकाने तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाचे (Builder) घर पेटवल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत बांधकाम व्यावसायिकाच्या घरातील सामान जळून आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी (PCPC Police) एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.23) सायंकाळी शुक्रवार पेठ, चावडी चौक येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत बांधकाम व्यावसायिक संजय रमेश बाविस्कर Sanjay Ramesh Baviskar (वय-43 रा. आदित्य हाईट्स, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अजय बाळकृष्ण पिंगळे Ajay Balkrishna Pingle (रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर आयपीसी 436, 454, 380 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी आरोपी अजय पिंगळे याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. याचा राग आरोपीच्या मनात होता. बाविस्कर यांनी तक्रार दिल्याच्या कारणावरुन आरोपीने त्यांच्या चावडी चौकातील बंद फ्लॅटचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करुन घरामध्ये आग (Fire) लावली. यामध्ये घरातील आठ लाख रुपये किंमतीचे साहित्य जळले.
तसेच आरोपीने चार हजार रुपये किंमतीचे घरातील गॅस सिलेंडर व
गिझर चोरी करुन नेल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खामगळ (PSI Khamgal) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हळदीच्या कार्यक्रमात राडा, नवरदेवावर कोयत्याने वार; तीन जणांना अटक, वाकड परिसरातील घटना

10 हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह, शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, चार जणांना अटक; कर्वेनगर मधील घटना

पीएमपीएमएल बस कर्मचाऱ्याला मारहाण करुन रोकड पळवली, दोघांना अटक; बिबवेवाडी परिसरातील घटना