Pune Pimpri Chinchwad Crime News | हळदीच्या कार्यक्रमात राडा, नवरदेवावर कोयत्याने वार; तीन जणांना अटक, वाकड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाच्या पंगतीमधुन ये-जा करु नका असे म्हटल्याच्या कारणावरुन तिघांनी गोंधळ घातला. तसेच नवरदेवावर कोयत्याने वार (Stabbing) करुन जखमी (Navardev Seriously Injured) केले. आरोपींनी हवेत कोयते फिरवून ‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट टाकीन’ असे म्हणत हळदी समारंभासाठी (Turmeric Event) आलेल्या नातेवाईकांमध्ये दहशत पसरवली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (PCPC Police) तिघांना अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) रात्री साडे अकराच्या सुमारास रहाटणी येथील जय भवानी चौकात घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रोहीत प्रकाश गायकवाड (वय-29 रा. जयभवानी चौक, रहाटणी) याने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विजय राहुल तलवारे (वय-22 रा. काळेवाडी), सनी राजीव गायकवाड (वय-22 रा. पिंपरी), अनिकेत बापु बनसोडे (वय-24 रा. पिंपरी) यांच्यावर आयपीसी 307, 504, 506(2), 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री फिर्यादी रोहित गायकवाड याच्या हळदीचा कार्य़क्रम होता. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास तिघेजण दुचाकीवरुन मंडपात आले. ते पंगतीमधुन ये-जा करीत असताना त्यांना ये-जा करण्यास मनाई केली. याचा राग आल्याने सुरुवातीला त्यांची रोहित याच्यासोबत बाचाबाची झाल्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी आरोपी पुन्हा हातात लोखंडी कोयता व रॉड घेऊन त्याठिकाणी आले.

आरोपी विजय तलवारे याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादी याचा मामेभाऊ शक्ती बनसोडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला जोरात धक्का दिल्याने तो खाली पडला. यामुळे चिडलेल्या विजय तलवारे याने रोहित गायकवाड याला जीवे मारण्याच्या उद्देशाने (Attempt to Kill) डोक्यात कोयत्याने वार केला. मात्र, रोहित याने वार चुकवल्याने त्याच्या डाव्या हातावर कोयता लागल्याने तो जखमी झाला.

इतर आरोपींनी त्यांच्याकडील लोखंडी रॉड व कोयते हवेत फिरवून हळदी समारंभासाठी आलेल्या नातेवाईकांमध्ये दहशत पसरवली.
तसचे ‘आम्ही येथील भाई आहोत,
आमच्या नादाला लागला तर तुमची विकेट टाकीन’ असे म्हणत
नातेवाईकांना कोयत्याची भिती दाखवत दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर (PSI Naik Nimbalkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

10 हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह, शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, चार जणांना अटक; कर्वेनगर मधील घटना

पीएमपीएमएल बस कर्मचाऱ्याला मारहाण करुन रोकड पळवली, दोघांना अटक; बिबवेवाडी परिसरातील घटना