Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : चाकण पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या मुलाचा उकळत्या पाण्यात बुडवून घेतला जीव

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चाकण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एक धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून एकाने सव्वा वर्षाच्या मुलाचा उकळत्या पाण्यात बुडवून खून (Murder In Chakan) केला आहे. ही घटना खेड तालुक्यातील (Khed Taluka) मौजे शेलपिंपळगाव येथे घडली असून याप्रकरणी चाकण पोलिस स्टेशनमध्ये (Chakan Police Station) एकाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

विक्रम शरद कोळेकर Vikram Sharad Kolekar (रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सव्वा वर्षाच्या मुलाच्या आईने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी विक्रम शरद कोळेकरचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. त्याने अनैतिक संबंधातून फिर्यादीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या गरम पाण्याच्या बकेटमध्ये खालीवर करून पाण्यामध्ये बुडवले.
मुलाची पाठ, डोके, चेहरा, पोट, पायाच्या मांडया पुर्णपणे भाजून कातडी जळुन लालसर झाली.
औषधोपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपीने फिर्यादीच्या माननेल्या बहिणला देखील जीवे ठार मारण्याची धमकी देत तिचा गळा दाबला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास चाकण पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक डेरे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Chakan Police Station – One and a half year old boy drowned in boiling water due to immoral relationship

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कोणी काहीही बोलत असेल तर…’

Ambadas Danve | ‘सभेला कुणी आडवं आलं तर…’, पाचोऱ्यातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटला इशारा

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण