Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘गॅस रीफिलिंग’ करणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदा गॅस रिफिलींग प्रकरणी (Illegal GAS Refilling) चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई चिखली परिसरातील चिंचेचामळा येथील सुर्यकिरण गॅस एजन्सी (Suryakiran Gas Agency) येथे सोमवारी (दि.5) रात्री पावणे बाराच्या सुमारास केली. या कारवाईत 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल बबन शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून गणेश गोवर्धन सरवदे (वय-26), साहिल शिवाजी शिंदे (वय-20 दोघे रा. म्हेत्रे वस्ती, चिखली) याच्यावर आयपीसी 379, 420, 285, 34 सह जिवनावश्यक वस्तुंचा कायदा 1955 चे कलम 3,7 सह (पुरवठा आणि वितरण नियमन) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिंचेचामळा येथील सुर्यकिरण गॅस एजन्सी येथे गॅस सिलेंडर मधून
रिपेरिंग सर्किटच्या साह्याने अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता दुसऱ्या लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफील
करत असल्याबाबत चिखली पोलिसांच्या तपास पथकाला माहिती मिळाली. पथकाने गॅस एजन्सी येथे छापा टाकला त्यावेळी आरोपी घरगुती भरलेल्या सिलेंडर मधून मोकळ्या सिलेंडर मध्ये गॅस रिफिल करताना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 30 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बंडगार्डन, हडपसर परिसरातील अपघातात दोन जणांचा मृत्यू

किरकोळ कारणावरुन तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण; येरवडा परिसरातील घटना

किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, दोघांना अटक; हडपसर परिसरातील घटना

Latur Crime News | पोलीस ठाण्यात अधंश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी चक्क बोकडाचा बळी; बिर्याणीही बनवून खाल्ली