Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदा भारतात वास्तव्य करणार्‍या उझबेकिस्तानी महिलेचा मृत्यू, वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदा भारतात वास्तव्य (Illegal Residence) करत असलेल्या उझबेकिस्तान (Uzbekistan) येथील 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News) महिलेला भारतात वास्तव्यासाठी बनावट कागदपत्रे (Forged Documents) तयार करुन देणाऱ्या दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

मुकेश बक्षोमल केसवानी Mukesh Bakshomal Keswani (वय 41, रा. रिव्हर रोड, पिंपरी), कृष्णा प्रकाश नायर Krishna Prakash Nair (वय 38, रा. चऱ्होली बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह मूळ वास्तव्य उझबेकिस्तान येथील असणाऱ्या 39 वर्षीय महिलेच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उझबेकिस्तान येथील ही महिला भारतामध्ये (India) विनापरवाना वास्तव्य करीत होती. तिला भारतात राहण्यासाठी आरोपींनी बनावट आधार कार्ड (Fake Aadhaar Card) व पॅन कार्ड (PAN Card) बनवून दिले होते. महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय (Prostitution) करुन घेतला. याप्रकरणी पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, ही महिला आरोपी मुकेश केसवानी याला भेटण्यासाठी 29 जुलै रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती.
त्यावेळी ती मोरवाडी येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. दरम्यान, तिची प्रकृती बिघडल्याने तिला शहरातील एका
खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला पुण्यातील ससून रुग्णालयात
(Sassoon Hospital) हलवण्यात आले. त्याठीकाणी उपचार सुरु असताना महिलेचा 18 ऑगस्ट रोजी
उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन अधिक तपास केला असता ती मूळची उझबेकिस्तान
येथील असून ती विनापरवाना भारतात राहत असल्याचे समोर आले. तिला भारतात राहण्यासाठी मदत करणाऱ्या
दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे (PSI Anirudh Savarde)
करीत आहेत.

महिलेचा मृतदेह मायदेशी पाठवणार

मृत महिलेचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तसेच याबाबत महिलेच्या उझबेकिस्तान
येथील नातेवाईकांना माहिती देण्यात आली. महिलेचा मृतदेह तिच्या मायदेशी उझबेकिस्तान येथे पाठवण्यात
येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kiara Advani | मुंबई एयरपोर्टवर अभिनेत्री कियारा आडवाणी झाली देसी लूकमध्ये स्पॉट; व्हिडिओ व्हायरल