Pune Pimpri Chinchwad Crime News | जेवण देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकावर धारदार हत्याराने वार, दोघांना अटक; सदाशिव पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हॉटेल बंद झाल्याने जेवण मिळणार नाही असे सांगितल्याच्या कारणावरुन दोघांनी हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच हॉटेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील मारहाण (Beating) करुन हातातील हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार सोमवारी (दि.18) रात्री साडे अकरा वाजता सदाशिव पेठेतील (Sadashiv Pethe) जयश्री पाव भाजी सेंटर येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत यशराज सुभाष भोसले (वय-29 रा. रोहन कृतीका बिल्डिंग, सिंहगड रोड, पुणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) मंगळवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. तर शुभम प्रमोद शिंदे, ओमकार शिंदे यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 506/2 सह महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशराज भोसले यांचे सदाशिव पेठेत जयश्री पावभाजी सेंटर (Jayshree Pavbhaji Centre) आहे. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्य़ादी व त्यांचे कामगार पाव भाजी सेंटर बंद करुन साफसफाई करत होते. त्यावेळी आरोपींनी त्याठिकाणी येऊन कामगारांसोबत वाद घालून फिर्य़ादी यांच्याकडे जेवण मिळेल का अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्य़ादी यांनी आरोपींना हॉटेल बंद झाल्याचे सांगितले.

या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या सोबत वाद घालून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
आरोपी ओमकार शिंदे याने सोबत आणलेल्या धारदार हत्याराने भोसले यांच्यावर
वार करुन गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला.
तसेच हॉटेल मधील कामगारांना देखील शिवीगाळ करुन मारहाण केली.
आरोपींनी तिथून जाताना हतातील धारदार शस्त्र हवेत फिरवून दहशत निर्माण केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने तिघांची 22 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार; मुंबईतील दोघांवर FIR