Pune Pimpri Chinchwad Crime News | घरात घुसून तलवारीने वार, आकुर्डी परिसरातील घटना; दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याचे पहायला मिळत आहे. आकुर्डी परिसरात एका घरात घुसून एकाला मारहाण केली. तुमको अभी छोडेंगे नाही, तुमको मार डालेंगे असे म्हणत एकावर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (PCPC Police) दोघांना अटक केली आहे. हि घटना आकुर्डी येथील पंचतारानगर येथे गुरुवारी (दि.7) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी शिवम दुबे उर्फ दुब्या, अमन पुजारी (दोघे अंदाजे 22 ते 24 वयोगटातील, पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 307, 452, 323, 506, 34 सह आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील व बहिणी घरात असताना दुबे आणि पुजारी हे दोघे
फिर्यादी तरुणीच्या घरात आले. कोणत्यातरी कारणावरून त्यांनी फिर्यादी तरुणीच्या वडिलांवर तलवारी सारख्या
हत्याराने वार केले. तुमको अभी छोडेंगे नही, तुमको मार डालेंगे असे म्हणत मारहाण करून गंभीर जखमी केले.
तसेच फिर्यादी तरुणीस चापटीने मारले, असे फिर्यादीत नमूद आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केकाण (PSI Kekan) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | ‘24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल’, जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा दिला इशारा

‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना

Malaika Arora Bossy Look | मलाइका अरोराच्या बॉसी लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल व्हिडिओ…

शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार