Pune Pimpri Chinchwad Crime News | वर पक्षाच्या खोलीतून सव्वा लाखांचा ऐवज लंपास, दिघी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दिवाळीनंतर लग्न सराईची धामधूम सुरु झाली आहे. मोठ्या हॉटेल आणि लॉन्सवर लग्न सोहळे मोठ्या दिमाखात पार पडत आहेत. दरम्यान, लग्नकार्यात महिलांची तयारी सुरु असताना चोरट्याने महिलेच्या पर्समधून दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.25) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडमुखवाडी येथील चंद्रफुल लॉन्स मधील वर पक्षाच्या खोलीत घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. यावरुन एका 30 ते 35 वर्षाच्या अंगात लाईनिंग असलेला निळसर शर्ट, ग्रे रंगाची पँट घातलेल्या अनोळखी चोरट्यावर आयपीसी 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वडमुखवाडी येथील चंद्रफुल लॉन्स मध्ये लग्न होते.
फिर्यादी या लग्नाची तयारी करत होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांची पर्स वर पक्षाच्या खोलीत ठेवली होती.
या पर्समध्ये 55 हजार रुपयांचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 70 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 25 हजार
रुपयांचा ऐवज होता. चोराने गर्दीचा फायदा घेऊन वर पक्षाच्या खोलीत प्रवेश करुन पर्समधील दागिने व रोख रक्कम
चोरून पळून गेला. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने दिघी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस हवालदार किरण जाधव करीत आहेत.

अवघ्या एका तासात घर साफ

उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करुन अवघ्या एका तासात चोरट्याने घरातील बॅगेमधून सोन्याचे दागिने, रोख रक्कम,
मोबाईल असा एकूण 67 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. हा प्रकार 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा या दरम्यान राणुबाई मळा, चाकण येथे घडली आहे.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | ‘जिलब्या गँगला जो कोणी नडणार, त्याची…’ दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या पिंपरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

NCP MP Supriya Sule | शिक्षण मंत्र्यांची उमेदवार मुलीला भर कार्यक्रमात ‘डिस्कॉलिफाय’ करण्याची धमकी, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

Pune Crime News | पुण्यात ट्रॅफिक जाममुळे महिलेचा मृत्यू, 17 तासानंतर वडगाव शेरी चौकातील टँकर बाजूला