Pune Pimpri Chinchwad Crime News | वाकडमध्ये दोन टोळक्यांमध्ये राडा, वाहनांची तोडफोड करुन लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | काळेवाडीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन टोळक्यांनी कोयते (Koyta) हवेत फिरवत राडा घातला. रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड केली. नढेनगर येथील गुन्ह्यात अल्पवयीन मुलांसह पाच सराईत गुन्हेगारांनी तीन रिक्षा, चार दुचाकींची तोडफोड करत तरुणाच्या खिशातून जबरदस्तीने 2100 रुपये काढून घेतले. तर काळेवाडी येथील डि-मार्टच्या पार्किंगमध्ये सात जणांच्या टोळक्याने कोयता आणि दगडाने तीन कारच्या काचा फोडून एकाच्या खिशातून 1400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

नढेनगर येथे झालेल्या घटनेत सिद्धार्थ संजय जगताप (वय-19 रा. जैनविहार कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), आयुष सुनिल खैरे (वय-18 रा. नढेनगर, काळेवाडी), हर्ष विनोद महाडिक (वय-20 रा. सहयोग कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 395, 427, 506 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रोहित प्रभाकर वाघमारे (वय-22 रा. शिवकृपा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) याने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (दि.3) रात्री पावणे एकच्या सुमारास घडला आहे.

शनिवारी मध्यरात्री नढेनगरमधील शिवकृपा कॉलनी येथे आरोपी सिद्धार्थ, आयुष, हर्ष आणि त्यांचे दोन साथीदार कोयते,
लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी कोयते आणि लाकडी दांडके हवेत फिरवत रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन रिक्षा
आणि चार दुचाकींची तोडफोड केली. त्यानंतर रोहित वाघमारे यांच्या खिशातून जबरदस्तीने 2100 रुपये काढून घेतले.
तसेच धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.

काळेवाडी येथील डी-मार्टच्या पार्किंगमध्ये घडलेल्या गुन्ह्यात शुभम अशोक तापकीर (वय 23, रा. पाचपीर चौक, काळेवाडी)
याला पोलिसांनी अटक केली असून इतर सहा जणांवर आयपीसी 395 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट,
महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महेंद्र प्रकाश सावंत (वय 37, रा. काळेवाडी) यांनी
वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सावंत हे काळेवाडी येथील डी-मार्ट पार्किंगमध्ये थांबले होते. यावेळी आरोपी एका कारमधून आले. त्यांनी कोयते आणि दगड मारून पार्किंगमधील तीन कारच्या काचा फोडल्या.
यानंतर सावंत यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने 1400 रुपये काढून घेतले.
त्यावेळी लोक जमा झाले असता आरोपींनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल – नितीनभाई देसाई, ज्येष्ठ उद्योगपती

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ( PI, API) बदल्या व नेमणूका

Pune Congress News | पुणे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरुन काँग्रेस भवनमध्ये राडा