Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : कुस्त्यांचा फड गाजवणाऱ्या पैलवानाचा भरदिवसा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या वादातून नामांकित पैलवानाचा भरदिवसा धारदार हत्याराने सपासप वार करुन खून (Murder Case) करण्यात आला. कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार Kailas alias Pintu Gulab Pawar (वय-39 रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) असे खून झालेल्या पैलवानाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.3) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मांजरवाडी येथे घडली आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्यातील (Narayangaon Police Station) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मांजरवाडी येथे गजराबाई साळुंके या महिलेचा आज सकाळी अकरा वाजता अंत्यविधी होता. यासाठी पैलवान कैलास पवार हे नातेवाईकांसह मांजरवाडी येथे आले होते.

अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व त्यांचे नातेवाईक असलेले संशयित तीन ते पाच जण साडेबाराच्या सुमारास हॉटेलमध्ये चहापाणी करण्यासाठी आले होते.
त्यावेळी जुन्या भांडणातून कैलास पवार व नातेवाईक यांच्यात वाद झाला. त्यामुळे कैलास पवार हे हॉटेलमधून बाहेर आले. ते रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोर झाडाजवळ थांबले. संशयित आरोपींनी कैलास पवार याच्या छातीवर, पाठीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कैलास पवार यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार
यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन संतप्त जमावाला शांत केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोक्का गुन्ह्यातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

मासे विकत घेण्यावरुन वाद, तरुणावर कोयत्याने वार; दहशत पसरवणाऱ्या तिघांना अटक, भोसरी परिसरातील प्रकार

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : एकत्रित तपासासाठी विठ्ठल शेलारसह 7 आरोपींना पोलीस कोठडी

तळेगाव दाभाडे : जुन्या वादातून हातोड्याने डोक्यात वार, जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल

पतसंस्थेने सील केलेल्या सदनिकेवर अतिक्रमण, डॉक्टरवर FIR; कोंढवा परिसरातील प्रकार

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर एकेरी भाषेत टीका, ”तू ओबीसींचं वाटोळं केलं…”