Pune Pimpri Chinchwad Crime News | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिंहगड रस्त्यावर टोळक्याचा राडा, कोयत्याने वार केल्याने एकजण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | नवीन वर्षाच्या (New Year) पहिल्याच दिवशी टोळक्याने (Koyta Gang) भर रस्त्यात धुडगूस घातला. टोळक्याने एकावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना पर्वती पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीतील सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) पानमळा वसाहत याठिकाणी सार्वजनिक रोडवर 1 जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जखमी किरण बाळू निमसे (रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे) याने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून सराईत गुन्हेगार सोन्या खुळे (रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड, पुणे) याच्यासह आदित्य चव्हाण, पियुष (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), तुषार कदम (रा. हनुमान नगर, दत्तवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण निमसे त्यांच्या मित्रासोबत सिंहगड रस्त्यावरील पानमळा वसाहत
येथील बुद्धविहारसमोरील सार्वजनिक रोडवर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले.
त्यांनी फिर्य़ादी आणि त्यांच्या मित्रासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यांनी आरोपींना विरोध केला असता आमच्या भांडणामध्ये यतोय काय? थांब तुला खल्लासच करतो,
असे बोलून कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी फिर्यादी यांनी कोयता हाताने पकडला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी आरोपी आदित्य चव्हाण याने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या (Attempt to Kill) उद्देशाने डोक्यात पाठीवर,
छातीवर, हातावर कोयत्याने वार केले. फिर्यादी यांचे मित्र त्यांना वाचवण्यासाठी येऊ लागले असता आरोपींनी त्यांना
कोयता दाखवून मध्ये आला तर सोडणार नाही अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे
(PSI Chandrakant Kamthe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीला मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Bhandara Sunflag Steel Company Blast | सनफ्लॅग कंपनीतील भीषण स्फोटाने भंडारा हादरला; ८ कामगार जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवार पेठेतील घटना; पतीवर FIR