Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तडीपार गुन्हेगाराला अटक, गावठी कट्ट्यासह काडतूस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड परिसरातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व एक काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी (दि.14) मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास मोशी परिसरातील सिल्व्हर लक्ष सोसायटी जवळ केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

करण कुमार जाधव (वय-26 रा. लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळ, मोशी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार राहुल (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार अमोल सुरेश दातार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तपास पथक मोशी परिसरात रात्रगस्त पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी माहिती मिळाली की, तडीपार गुन्हेगार करण जधव हा एका रिक्षातून (एमएच 14 एचएम 6449) पिस्टल घेऊन सिल्व्हर लक्ष सोसायटी परिसरात फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात आरोपीचा शोध घेत असताना खदानच्या कच्चा रस्त्यावरुन एक रिक्षा जाताना दिसली. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करुन रिक्षा थांबवली असता आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळून जाणाऱ्या दोघांपैकी करण जाधव याला ताब्यात घेण्यात आले तर त्याचा साथीदार राहुल फरार झाला. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व काडतून मिळाले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन आरोपीला अटक केली आहे.

करण जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर भोसरी, एमआयडीसी भोसरी, निगडी, विश्रांतवाडी, चाकण, पिंपरी पोलीस ठाण्यात 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला 17 फेब्रुवारी 2022 मध्ये पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व पुणे ग्रामीणच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन तो पिंपरी चिंचवड परिसरात फिरत होता. त्याच्याकडून 25 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 84 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, नराधम बापाला अटक