Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तडीपार गुन्हेगारांसह दोघांना अटक, पिस्टल, काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून (Pimpri Chinchwad Police) बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहेत. पोलिसांनी एका तडीपार गुन्हेगारांसह दोघांना अटक करुन पिस्टल, काडतुसे असा एकूण 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी निगडी (Nigdi Police Station) आणि देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने देहुरोड येथील गांधीनगर येथील मोकळ्या मैदानातून एका तडीपार गुन्हेगाराला अटक करुन 40 हजार रुपयांचे पिस्टल आणि दोन हजार रुपयांचे दोन काडतुसे असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.4) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. बुग्गी उर्फ मोबिन सलीम शेख (वय-29 रा. गारुडी वस्ती, गांधीनगर, देहुरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला विशेष न्यायालय, मोक्का कोर्ट (MCOCA Court) यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार (Tadipar From Pune) केले आहे. तडीपार असताना कोणतीही परवानगी न घेता तो शहरात वावरत होता. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

तसेच रिक्षाचालक मोहमद महेबुब कोरबु (रा. 27 रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 35 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व 500 रुपयांचे एक काडतुस जप्त केले आहे.
ही कारवाई शनिवारी (दि.4) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर येथे करण्यात आली.
याबाबत पोलीस अंमलदार विनायक सुभाष मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमरिष देशमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Ajit Pawar | ‘अजित पवारांचा तोल ढळलाय’ शरद पवारांची थेट टीका

Murlidhar Mohol | कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद,
‘मोदी… मोदी…’ जयघोष !!!

Baramati Lok Sabha | बारामतीसह 11 मतदारसंघात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार,
तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान